पुणे -प्रत्येक शहराचा एक वेगवेगळा इतिहास असतो. त्या-त्या शहराची एक ओळख असते. (Historic Bhide Bridge In Pune ) येथील भाग, चौक, इमारती, पूल, नद्या, मंदिर, ही एक शहराची ऐतिहासीक ओळख. असाच पुणे शहरातील प्रतिष्ठीत असणारा पुल म्हणजे भिडे पूल. पुणे महापालिकेकडून मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरणाचा एक प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. (Mula-Mutha river beautification project) त्या पार्श्वभूमीवर आता हा भिडे पूल पाडण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. दरम्यान, भिडे पूल तसेच नदी पात्रातला रस्ता तुर्तास बंद करण्यात येणार नाही (Pune Municipal Corporation) असे स्पष्टीकरण पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे.
हे साकव पुण्यातील तरुणांच्या आवडीचे होते
पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातल्या मुठा नदीवर एकेकाळी, लकडी पुलाच्या दोनही बाजूला प्रत्येकी दोन, असे चार साकव (काॅजवे) होते. एम.ई.एस. (गरवारे) काॅलेजजवळ, पांचाळेश्वरजवळ, सध्याच्या (बाबा) भिडे पुलाच्या जागी आणि पुलाची वाडी येथे, असे ते चार पूल होते. या पुलांचा उपयोग सायकलस्वार आणि पादचारी करीत. हे साकव पुण्यातील तरुणांच्या आवडीचे होते. संध्याकाळच्यावेळी उगाच चक्कर मारण्यासाठी लोक येथे येत असत.
जिमखाना परिसरातील वर्दळ प्रमाणाबाहेर वाढू लागली
सन (१९९२-९३)च्या सुमारास संभाजी पुलाच्या दोन्ही बाजूस दुचाकी वाहनांसाठी आणखी दोन पूल बांधण्यात आले. एक पूना हाॅस्पिटलजवळ आणि दुसरा डेक्कन जिमखाना बस स्टॅंडच्या बाजूस. हे बांधल्यावर लकडी पूल दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला. काही काळानंतर जिमखाना परिसरातील वर्दळ प्रमाणाबाहेर वाढू लागली, म्हणून महापालिकेने उर्वरित तीन साकव पाडून टाकले.
मुठेला पूर आल्यावर पाण्याखाली जातो
पुढे नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागल्यामुळे महापालिकेने डेक्कन जिमखाना बस स्टॅंडच्या बाजूचा दुचाकी पूल पाडून त्याजागी सन (१९९६)साली एक नवा सर्वोपयोगी पूल बांधण्यात. हा पूल तयार झाल्यावर त्याला जनसंघाचे नेते बाबा भिडे यांचे नाव दिले. हाच तो भिडे पूल. मुठेला पूर आल्यावर पाण्याखाली जातो, आणि पूर ओसरल्यावर वाहतुकीसाठी पुन्हा सज्ज होतो.तो आता मनपाने काही प्रकल्पाच्या अंतर्गत पाडण्याचा निर्णय घेतला आहे.