पुणे :भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गेल्या शनिवारी पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ( Pune Municipal Corporation ) हल्ला झाला ( Kirit Somaiya Attack ) होता. त्यानंतर ते संचेती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. आठवडाभरानंतर किरीट सोमय्या यांनी पुण्यात पुन्हा दौरा आयोजित केला ( Kirit Somaiya Pune Visit ) होता. या पुणे दौऱ्याच्या निमित्त त्यांनी ईटीव्ही भारतसोबत खास बातचीत केली. त्यात त्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विविध आरोप केले ( Kirit Somaiya Serious Allegation On Uddhav Thackeray ) आहेत.
माझ्यावरचा हल्ला हे उद्धव ठाकरेंचं कारस्थान : किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप जम्बो कोविड सेंटरमध्ये गैरव्यवहार
मागच्यावेळी जेव्हा महापालिकेमध्ये सोमय्या निवेदन द्यायला आले होते तेव्हा त्यांनी जंबो कोविड सेंटरबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर आरोप केले होते. या विरोधात शिवसैनिकांनी जेव्हा किरीट सोमय्या गेल्या शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा महापालिकेच्या द्वारावर त्यांच्यावर धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये त्यांना जोरदार मार लागला होता. मात्र, आठवड्यानंतर परत महापालिकेत किरीट सोमय्या यांनी दौरा केला असून, या दौऱ्यामध्ये त्यांनी महापालिकेमध्ये येऊन जम्बो कोविड रुग्णालयात जो गैरव्यवहार चालू आहे, त्याच्या चौकशीबाबत निवेदन दिले आहे.
भाजपचे शक्तिप्रदर्शन
किरीट सोमय्या आज महानगरपालिकेमध्ये आले तेव्हा भाजप भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर शिवसेनेने त्यांना धक्काबुक्की करत खाली पडले होते. त्याच पायऱ्यांवर भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांचा नारळ आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन भाजपकडून करण्यात आले.