महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 25000 महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण - सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 25000 महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. 101 महिलांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात गेल्या काही वर्षांपासून मोठी वाढ होत आहे. यंदा 25 हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

By

Published : Sep 3, 2019, 10:05 AM IST

Updated : Sep 3, 2019, 10:50 AM IST

पुणे - शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पासमोर मंगळवारी पहाटे हजारो महिलांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. पहाटेच्या मंगलमय वातावरणात ओंकाराचा गजर करत अथर्वशीर्ष एका सुरात एका तालात पठण करण्यात आले. दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून हा उपक्रम ऋषीपंचमीच्या दिवशी राबवला जातो. याही वर्षी तब्बल 25 हजारांपेक्षाही जास्त महिला या अथर्वशीर्ष पठणासाठी उपस्थित होत्या.

हेही वाचा - पुढील मुख्यमंत्री फडणवीसच... अनंत चतुर्दशीनंतर होणार जागा वाटपाची घोषणा - रामदास आठवले

पारंपरिक वेशभूषेत उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी परदेशी पाहुणे देखील या उपक्रमाला उपस्थित होते. विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला अथर्वशीर्ष पठणाचे महत्व त्यामागचा उद्देश भक्तांना सांगण्यात आला. त्यानंतर सात ते आठ महिलांनी शंखनाद करत उपक्रमाला सुरुवात केली. हजारो महिलांच्या आवाजात अथर्वशीर्ष आसमंतात गुंजले.‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल 25 हजारहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला.

25000 महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

हेही वाचा - जलसंवर्धनाचा उपक्रम; ३० वर्षांपासून तरुणाईचे आकर्षण असलेले 'बाप्पा मंडळ'

पारंपरिक वेशात पहाटे पाच वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. या उपक्रमाचे 33 वे वर्ष होते. 101 महिलांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात गेल्या काही वर्षांपासून मोठी वाढ होत आहे. यंदा 25 हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

Last Updated : Sep 3, 2019, 10:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details