पुणे: पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट एरिया हा खूप प्रसिद्ध असून या भागात हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात. pune police गेल्या 6 महिन्यांपासून देहू रोड परिसरात राहणारा एक युवक दररोज येथे यायचा.आणि इथ आल्यानंतर तो या परिसरात उभे असलेल्या दुचाकी चोरून नेत होता. Pune Crime फरासखाना पोलीस स्टेशन Faraskhana Police Station हदीत गेल्या 6 महिन्यापासून वाहन चोरीचे प्रमाण वाढले होते. हे वाहन चोरी रोखणे हे पोलीसांसमोर एक आव्हान झाले होते. या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून या दुचाकी चोरी झालेल्या भागातील CCTV कॅमेरे पाहून आरोपीचा शोध घेण्यात सुरवात झाली, आणि मग पोलिसांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 250 हून अधिक CCTV पाहून या दुचाकी चोरणाऱ्या सराईतांकडून तब्बल 16 मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.
१७ गुन्हे उघडकीस सोहेल युनुस शेख, वय २६ वर्षे व्यवसाय मजुरी, रा पारसा चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशन जवळ, थापा गरजच्या पाठीमागे देहू रोड, ता मावळ, जि पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या ४,४०,००० रुपये किमतीच्या १६ मोटारसायकल जप्त केल्या असुन १७ गुन्हे उघडकीस आले आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की आरोपी सोहेल शेख हा अधून मधून पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट भागात येत होता. तिथं आल्यावर परिसरात लावण्यात आलेल्या दुचाकी तो चोरून नेहून जात होता.