पुणे - दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ गुंफेच्या ( Amarnath Caves ) पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक शुक्रवारी ढगफुटी ( Amarnath Cloudburst ) झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात १५ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता आहे. अमरनाथ यात्रेसाठी ( Amarnath Yatra ) पुणे जिल्ह्यातील 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. यातील पुण्यातील धायरी येथील सुनिता महेश भोसले यांचा या दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी दिली आहे.
8 जण बेपत्ता -पुणेजिल्ह्यातील 50 हून अधिक यात्रेकरू हे अमरनाथ येथे पिंपरी वरून गेले होते. यातील 8 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 50 जणांच्या पैकी 42 लोकांशी संपर्क झाला असून 8 जणांशी अजूनही संपर्क नाही. धायरी येथील महेश भोसले, सुनिता महेश भोसले, प्रमिला प्रकाश शिंदे हे तिघे अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. यात सुनिता महेश भोसले यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोसले कुटुंबीयांना भेट देत सांत्वन केले आहे.
दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रा तळानजीक शुक्रवारी ढगफुटी झाल्याचे अधिकाऱ्यांनी ( Amarnath Yatra Cloudburst )सांगितले. यात १६ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता भाविकांमध्ये पुण्यातील आठ भाविकांचा समावेश असल्याचे समोर आले ( Pune Devotees go missing in Amarnath ) आहे.अमरनाथ गुंफेच्या परिसरात काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटी झाली. प्रचंड पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालयांचे नुकसान झाले असून, तेथे बचाव मदतकार्य सुरू आहे.