पुणे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांना सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री केल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawar ) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. फडणवीस एकट्याने इतक्या जिल्ह्यांचा कारभार कसा पाहणार असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला होता. त्यावर फडणवीसांनीही अजितदादांना तात्काळ प्रत्युत्तर दिले होते. एकावेळी अनेक जिल्ह्यांचा कारभार कसा पाहायचा याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना देईन अशी, खोचक टिप्पणी फडणवीस यांनी केली होती.
अजित पवारांचा फडणवीसांना टोला -त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचे पवार यांनी म्हटल आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विचारणार आहे की, मी तुमच्याकडे ट्रेनिंगला कधी येऊ, त्यासाठी किती फी लागेल? फडणवीस मला ही ट्रेनिंग ( Ajit Pawar will take training from Devendra Fadnavis ) मोफत देणार आहेत का? की फी घेणार. त्यांच्याकडे जाऊन मी माझ्या ज्ञानात भर घालतो असा उपरोधीक टोला पवार यांनी फडणवीसांना लगावला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यावर कडक कारवाई करा - पीएफआयवर बंदी आली असून पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली आहे.पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबत प्रत्येक जण आपापल्या परीने आपले मत व्यक्त करत आहे. अशा देशद्रोही घटना करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी तपास लवकरात लवकर पुर्ण करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
भुजबळ वक्तव्याशी राष्ट्रवादीचा संबंध नाही - माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, छगन भुजबळ यांचे तो वयक्तिक मत आहे. पक्षाचं मत नाही. प्रत्येकाला आपले वयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे. पक्षाने त्याबाबत आपली भूमिका मांडली आहे अस यावेळी पवार म्हणाले. अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, मला याबद्दल काहीही माहीत नाही. आमच्याकडे कोणीही आलेलं नव्हत. काँग्रेसच्या लीडरने सांगितलेलं तो विषय आहे. त्यामुळे तेच लोक जास्त अधिकार वानिनी बोलू शकतात. आत्ता आपण 2022 मध्ये आहोत. दोन ते तीन महिन्यांनी 2023 लागेल. कुठं आपण मागे 2014 मध्ये जात आहोत. उद्या काय करायचं आहे ते ठरवल पाहिजे. सध्या महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे आहे.अस यावेळी पवार म्हणाले
शिंदे सरकारमध्ये नाक घुपसायच काय कारण - बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मारहाण केली आहे. यावर पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, अशा पद्धतीने मारहाण करणे अजिबात योग्य वाटत नाही. तसेच शिंदे सरकारमध्ये अपक्ष आमदार हे नाराज आहे असं यावेळी पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, त्यांचे ते ठरवतील त्यांनी सरकार बनवले आहे. त्यांनी कोणाला खुश करायचे कोणाला नाराज करायचं हा त्यांचा अधिकार आहे.आम्ही त्याच्यात नाक घुपसायच काय कारण आहे.अस यावेळी पवार म्हणाले. राज्यात पोलिस यंत्रणेवर ताण आला आहे. याबाबत पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, ज्या वेळेस मोठमोठे राजकीय मेळावे घडतात. त्यावेळेस अशा घटना घडतात. आता शिवसेना आणि शिंदे गटात इर्षा निर्माण झालेली आहे. कोणाचा दसरा मेळावा हा मोठा होतो. इतरांना त्रास न होता ते आपापल्या पद्धतीने करतील अस देखील यावेळी पवार म्हणाले.