पुणे - जिल्ह्यात पूर आलेला असताना मंत्री महोदय मात्र वेगळ्याच गोष्टीत मग्न आहेत, अशी टीका करतेवेळी अजित पवारांची गिरीष महाजनांवर बोलताना जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. शिवस्वराज्य यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
अजित पवारांची घसरली जीभ, म्हणाले गिरीष महाजन... - ajit pawar in nashik
भाजपने 2014 मध्ये छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. आता राष्ट्रवादी देखील संभाजी राजेंच्या मालिकेतून प्रसिद्ध झालेला चेहरा शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना राज्यभर फिरवणार आहे.
राज्यात अजून काही गोष्टी घडतील. काही लोक थांबतील, तर कोणी निघून जाईल. मात्र, सगळ्या भागातून आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत. आपल्याला राज्यात आघाडीच्या 175 जागा निवडून आणायच्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले. राज्यात इतर पक्षांच्या यात्रा सुरू असताना राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा शिवजन्मभूमीतून निघाली आहे. भाजपने 2014 मध्ये छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. आता राष्ट्रवादी देखील संभाजी राजेंच्या मालिकेतून प्रसिद्ध झालेला चेहरा शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना राज्यात फिरवणार आहे.