मुंबई-बॉलिवूड अभिनेता सलमान खान, ( Bollywood actor Salman Khan ) तसेच त्यांचे वडील सलीम खान ( Salim Khan threatened ) यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बॉलिवूडमधील कलाकारांकडून खंडणीसाठी देण्यात आली होती अशी माहिती महाकाल उर्फ सौरभ कांबळे यांच्या चौकशीतून समोर येत आहे. मुंबई क्राईम ब्रँचला ( Mumbai Crime Branch ) तशी माहिती मिळाल्याची बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. अभिनेता सलमान खान तसेच सलीम खान यांना 5 जून धमकी पत्र मिळाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
चौकशी दरम्यान ही माहिती प्राप्त -महाकाल उर्फ सौरभ कांबळे यांची पुण्यात क्राईम ब्रांचने केलेल्या चौकशी दरम्यान ही माहिती प्राप्त झाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात संशयित आरोपी म्हणून त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. धमकी पत्राबाबत महाकाल याची चौकशी केली असता त्यानं धक्कादायक खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खान याला धमकी देऊन बॉलीवूड विश्वात भीती निर्माण करण्याचा उद्देश होता. जेणेकरुन बड्या कलाकारांकडून खंडणी वसुल करता येईल, असे महाकालने कबुल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बॉलीवूडमध्ये निर्माण करायची होती भीती -धमकीच्या पत्रातून बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करण्याचा इरादा होता असा खुलासा महाकाल यानं केला आहे. खंडणीसाठीची रक्कम मिळाली असती तर, पुढची रणनिती आखली गेली असती. याचा मास्टरमाईंड हनुमानगढचा विक्रम बरार होता. जो लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बरार यांचा खूप जवळचा साथीदार आहे. बॉलीवूडमध्ये खंडणीखोरीचं जाळं सुरू करण्यासाठी प्रत्येक गोष्ट यानंच प्लॉन केली होती असाही खुलासा महाकाल यानं केल्याचं समजतं.
तीन लोकांची निवड -सुत्रांच्या माहितीनुसार विक्रम बरार याच्या प्लानला खुद्द गोल्डी बरार यानंच हिरवा कंदील दाखवला होता. यानुसार विक्रम बरार यानं बॉलीवूडमधील खंडणीखोरीची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानं या कामासाठी राजस्थानमधील तीन लोकांची निवड केली होती. ज्यांची महाकाल याच्यासोबत कल्याण रेल्वेस्थानकात भेट झाली होती. सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पत्र कसं पोहोचवता येईल याचं संपूर्ण प्लानिंग यांनीच केलं होतं. सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीपत्रामागे त्याच्यावर हल्ला करण्याचा उद्देश नव्हता. फक्त बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करायची होती असंही महाकाल यानं स्पष्ट केलं आहे.
दोघांना गंभीर धमक्या -या पत्रात सलमान आणि सलीम खान दोघांना गंभीर धमक्या देण्यात आल्या आहेत. मुसावला जैसा कर दुंगा अशा आशयाचं ते पत्र होतं. गेल्या आठवड्यात पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे गँगस्टर लॉरेंस बिश्नोई असल्याची माहिती समोर आली होती. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लॉरेंसने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेसचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2021 मधील आहे. जेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेंस आणि त्याच्या गँगला देशातील वेगवेगळ्या राज्यातून मकोका केसअंतर्गत ताब्यात घेतलं होतं. या व्हिडीओमध्ये लॉरेंससह त्याचा साथीदार संपत देखील दिसत आहे. संपत हा लॉरेंसचा राजस्थानचा साथीदार आहे. संपतने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर रेकी केली होती.