महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 पुण्यात देखाव्यातून मेट्रो कॉरिडॉर 2 ची साकारली प्रतिकृती, पुण्यातील सम्राट रावते यांची कल्पक्ता

पुण्यातील अनेक भागात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी Ganeshotsav 2022 विविध देखाव्यांचे प्रदर्शन केले. पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवासी सम्राट रावते created by Samrat Rawate यांनी एक अनोखा देखावा A replica of Metro Corridor 2 seen in Pune तयार केला आहे.

Ganeshotsav 2022
मेट्रो कॉरिडॉर 2 ची साकारली प्रतिकृती

By

Published : Sep 3, 2022, 6:23 PM IST

पुणे दोन वर्षांनंतरनिर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा Ganeshotsav 2022 होत असल्याने, सर्वच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या माध्यमातून यंदा विविध विषयांवर देखावे सादरे केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवासी ऍड. सम्राट रावते created by Samrat Rawate आणि मित्र परिवार यांनी मिळून एक अनोखा देखावा A replica of Metro Corridor 2 seen in Pune तयार केला आहे.

मेट्रो कॉरिडॉर 2 ची साकारलेल्या प्रतिकृतीबाबत माहीती देतांना ऍड. सम्राट रावते



या देखाव्यात आपल्याला 'पुण्याच्या मेट्रो' चे दर्शन त्यांनी घडवले आहे. पुणे मेट्रो प्रकल्प कॉरिडॉर-2, वनाझ ते रामवाडी अंतर्गत "बंडगार्डन - येरवडा - कल्याणीनगर मेट्रो ट्रॅक आणि मेट्रो स्टेशन" याची काल्पनिक स्वरूपात उभारणी त्यांनी केली आहे.



पुण्यात मेट्रोचे जाळे काही दिवसात अजून विस्तारणार असून; ते या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न रावते यांच्याकडून करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी तब्बल २२ दिवस तयारी केली आहे. त्याचबरोबर या देखाव्यात त्यांनी 11 फूट लांब मेट्रो ट्रॅक, 3 मेट्रो स्टेशन, 3 मेट्रो ट्रेन, 32 मेट्रो ब्रिज खांब, मुळा - मुठा नदी, सायकल ट्रॅक, फूट फुटपाथ, ब्रिटीश कालीन पूल, नवा आणि जुना बंडगार्डन पूल यांची उभारणी केली आहे. जे पाहून सगळेच अगदी भारावून जातील यात काही शंका नाही. Ganeshotsav 2022

ABOUT THE AUTHOR

...view details