पुणे : 2021 हे वर्ष कोरोना कालावधीत गेले. आज इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातील राज्यातील अनेक मंदिरे सजली आहे. त्यानिमित्त पुण्यातील मानाचा गणपती श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंदिराला ( Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Darshan ) आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिरात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे.
नवीन वर्षाच्या औचित्य साधून सगळीकडे जल्लोष करण्यात येत आहे. पर्यटनस्थळाबरोबर मंदिराच्या दारातही नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी गर्दी केली आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही श्रीमंत दडूशेठ हलवाई गणपती मंदिर अतिशय सुंदर रित्या सजवले आहे. बाप्पांची मुर्ती देखील आकर्षकरित्या सजवण्यात आली असून, मूर्तीला मानाचा फेटा देखील घालण्यात आलाय.