महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्याच्या बालेवाडीत 500 खाटांचे कोविड केअर सेंटर

पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तीन हजार पार गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ही रुग्ण संख्या वाढली तर त्यासाठी प्राथमिकरित्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे
पुणे

By

Published : May 16, 2020, 7:48 PM IST

पुणे - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बालेवाडी स्टेडियम येथे 500 खाटांचे 'कोविड केअर सेंटर' उभारण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी वॉर रूम आणि बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

पुणे

पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तीन हजार पार गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ही रुग्ण संख्या वाढली तर त्यासाठी प्राथमिकरित्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

हजार बेड तयार करण्याचा विचार केला आहे, आता प्राथमिकरित्या 500 बेडची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. महापालिका वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व सुविधा असलेले कोविड केअर रुग्णालय उभारण्यात आले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात 500 खाटाचे आयसोलेश तयार करण्यात आले आहे. तिथे 'स्टँड अलाऊ ऑक्सिजन सिलिंडर' ठेवण्यात आले आहे. काही खाटांना आपत्कालीन सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details