पुणे -इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून एका 26 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल समोर ही आत्महत्येची घटना घडली आहे. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून 26 वर्षीय महिलेची आत्महत्या - महिलेची आत्महत्या
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून एका 26 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल समोर ही आत्महत्येची घटना घडली आहे.
उपचारापूर्वीच मृत्यू -
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका पवन ससाने (वय-26 रा. माधुरी मिलिंद कॉम्पलेक्स) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सिंहगड रोडवरील अभिरुची मॉल समोर ही घटना घडली आहे. महिलेने चौथ्या मजल्यावरुन उडी घेतल्यानंतर तिला जखमी अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.
आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट -
या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.