पुणे : राज्यासह पुण्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आता एक लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या 99 हजार 431 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.
शहरात 5373 नवे रुग्ण
पुणे शहरात 16 एप्रिलला दिवसभरात 5 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 5049 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात कोरोनाबाधीत 65 रुग्णांचा मृत्यू झाला. यातील 14 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या शहरात 1196 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3 लाख 54 हजार 797 इतकी झाली आहे. सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 54 हजार 624 इतकी आहे. पुणे शहरात आजपर्यंत एकूण 6002 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी शहरात 23 हजार 564 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 10963 नवे रुग्ण
जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात दिवसभरात 10 हजार 963 नवे पॉझिटिव्ह रुग्ण वाढळले आहेत. सध्या जिल्ह्यात 99431 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातले 24 हजार 508 हॉस्पिटल मध्ये तर 74 हजार 923 होम आयसोलेशन मध्ये आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 109 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 11 हजार 212 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.