पुणे - पुणे - मुंबईदरम्यान दररोज ( Birthday of Deccan Queen Celebrated in pune ) रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणीने (डेक्कन क्वीन) आज 93 व्या वर्षात पदार्पण ( Deccan Queen news ) केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या माध्यमातून आज डेक्कन क्वीन चा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, डेक्कन क्वीनचे प्रवाशी, रेल्वे प्रशासन आदी लोक यावेळी उपस्थित होते.
अशी सुरवात झाली -पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून १९३० रोजी डेक्कन क्वीनची सेवा सुरू करण्यात आली. त्याला आता 92 वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने पहिली 'लक्झरिअस सेवा' म्हणून पुणे-मुंबई मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरू केली होती. महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसी, 'पॅलेस ऑन व्हील्स' यांसारख्या महागड्या गाड्यांमध्ये असलेल्या अनोख्या 'डायनिंग कार'चा डेक्कन क्वीनमध्ये समावेश आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनला इतर इंटरसिटी गाड्यांपेक्षा वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दर वर्षी एक जूनला ही गाडी मुंबईला रवाना होण्यापूर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप आणि पुणे ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या थाटात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.