पुणे- ससून रुग्णालयात आज दिवसभरात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील मृतांचा आकडा ५६ वर गेला आहे. यातील ४६ रुग्ण ससून एकट्या रुग्णालयातील आहेत.
ससून रुग्णालयात आज दिवसभरात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा ५६ वर - कोरोना संसर्ग
पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
कोरोना संसर्गाने देशभर खळबळ उडवून दिली आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ५६ वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये एकट्या ससून रुग्णालयातील ४६ रुग्ण आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर कोरोनाबाधित ७३४ रुग्ण आहेत. यातील ११४ रुग्ण ससून रुग्णालयात आहेत.