महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील 2177 जिल्हा परिषद शाळा पावसामुळे प्रभावित, शिक्षण मंत्री शेलारांची माहिती - पूणे बातमी

राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा घेण्यासाठी आशिष शेलार पुणे दौऱ्यावर आले होते. शेलार यांनी आज सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पूर बाधित जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी 21 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 2 हजार 177 शाळा प्रभावित झाल्या आहेत, अशी माहिती दिली.

राज्यातील 2177 जिल्हा परिषद शाळा पावसामुळे प्रभावित

By

Published : Aug 11, 2019, 9:11 PM IST

पुणे - राज्यातल्या २१ जिल्ह्यातील २ हजार १७७ जिल्हा परिषद शाळांना महापुराचा फटका बसला आहे. या शांळाची दुरुस्ती आणि पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी शाळांना ५७ कोटींचा निधी शिक्षण विभागाकडून देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

राज्यातील 2177 जिल्हा परिषद शाळा पावसामुळे प्रभावित, शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची माहिती

राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा घेण्यासाठी आशिष शेलार पुणे दौऱ्यावर आले होते. शेलार यांनी आज सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पूर बाधित जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागातील सर्व संचालक, बालभारती, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सचिव आणि संबंधित बाधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अशिष शेलार म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टीमुळे आठ शिक्षण विभागापैकी सहा विभाग पूरस्थितीने बाधित झाले आहेत. या जिल्ह्यातील 155 तालुक्यात नुकसान झाले आहे. या 21 जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2 हजार 177 शाळा प्रभावित झाल्या आहेत.

त्यामुळे तातडीने 53 पूर्ण वर्ग खोल्याचे बांधकाम आणि 2 हजार 177 शाळांच्या वर्ग खोल्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. 260 शाळांमधील 27905 विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके पूरामुळे बाधित झाली आहेत. एकंदरीत यासाठी 57 रुपये कोटी एवढ्या निधीची गरज आहे. त्यामुळे हा निधी थेट शाळेच्या बँक खात्यामधे जमा करण्यात येणार आहे. या शाळांची स्थानिक पातळीवर दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्या प्रमाणेच पूर परस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांची माहिती गोळा करून त्यांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details