महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune : नवले पुलाजवळ सलग तिसऱ्या दिवशी अपघात, 2 महिला जखमी - पुणे अॅक्सिडेंट न्यूज

एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनाला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात एक चारचाकी, एक दुचाकी व एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली.

नवले पूल अपघात
नवले पूल अपघात

By

Published : Oct 23, 2021, 8:45 PM IST

पुणे - बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पूल परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनाला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात एक चारचाकी, एक दुचाकी व एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली.

नवले पुलाजवळ अपघात

दोन महिलांचा मृत्यू

नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, आज शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला असून एका थिनर घेऊन निघालेल्या टँकरने १७ सिटर ट्रॅव्हलरला जोराची धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी होऊन सेवा रस्त्यावर पडली. यावेळी सेल्फी गार्डनमध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाल्याचे समजत आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत.

ट्रॅव्हलरला धडक

आज शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला असून एका थिनर घेऊन निघालेल्या टँकरने १७ सिटर ट्रॅव्हलरला जोराची धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी होऊन सेवा रस्त्यावर पडली. यावेळी सेल्फी गार्डनमध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाल्याचे समजत आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details