महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Corona Update : पुण्यात 100 कोरोना चाचण्यामागे सापडले 'इतके' बाधित रुग्ण, वाचा सविस्तर... - पुणे कोरोना रुग्णसंख्या

शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चाचण्यांवरती (Pune Corona testing ) भर दिला जात आहे. आत्तापर्यंत शहरात ३७ लाख ९३ हजार जणांच्या कोरोना चाचण्या ( Total Number Of Corona Test In Pune ) केल्या असून त्याद्वारे ५ लाख ८ हजार २९० जण पॉझिटिव्ह ( Pune Corona Patient Total Number ) आले आहेत.

Pune Corona testing
Pune Corona testing

By

Published : Dec 21, 2021, 5:34 PM IST

पुणे - शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चाचण्यांवरती (Pune Corona testing ) भर दिला जात आहे. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेले तसेच कोरोनाची लक्षण असलेल्या नागरिकांच्या टेस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शहरात ३७ लाख ९३ हजार जणांच्या कोरोना चाचण्या (Total Number Of Corona Test In Pune ) केल्या असून त्याद्वारे ५ लाख ८ हजार २९० जण पॉझिटिव्ह ( Corona Patient Total Number ) आले आहेत. म्हणजेच १०० चाचण्यांमागे १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

शहरात आतापर्यंत ८० टक्के आरटीपीसीआर चाचण्या -

पुणे शहरात महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थरावर तसेच महापालिका रुग्णालयात कोरोना चाचणी केंद्र उभारली आहेत. त्याच प्रमाणात शहरात खासगी टेस्ट सेंटरच्या माध्यमातून कोरोना निदान करण्यात आहेत. या चाचणी केंद्राच्या माध्यमातून दररोज पाच ते सहा हजार जणांची कोरोनासाठी चाचणी करण्यात येते. आतापर्यंत शहरात जवळपास ३८ लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८० टक्के चाचण्या या आरटीपीसीआर व उरलेल्या अँटिजेनच्या आहेत. शहरात महापालिकेची रुग्णालये, चाचणी सेंटर तसेच खासगी रुग्णालये येथे या चाचण्या करण्यात येतात. या सर्व चाचण्यांचा अहवाल पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जातो.

चार लाख ९८ हजार रुग्ण घरी परतले -

आतापर्यंत जे ५ लाख ८ हजार रुग्ण आढळले, त्यापैकी ४ लाख ९८ हजार ३०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उरलेल्या ९ हजार १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात ८७४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ८३ गंभीर, ६५ ऑक्सिजनवर आहेत.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यावर भर -

शहरात कोरोना चाचण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येते आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनान करत आहे. शहरात सध्या रोज 6 हजार चाचण्या करण्यात येत आहे. सुरुवाती पासूनच कोरोना रोखण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्यावर भर असून त्यामुळे काही प्रमाणात कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य प्रमुख आशिष भरती यांनी दिली.

हेही वाचा -BJP - NCP Clashes Beed : बीडमध्ये भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने.. जोरदार राडा

ABOUT THE AUTHOR

...view details