पिंपरी-चिंचवडमध्ये नूतन वर्षाच स्वागत वाहन तोडफोडीने; 13 जण ताब्यात - पिंपरीत १३ जणांना अटक
चवड मोहन नगर येथे काही तरुण एकत्र येऊन न्यू इयरच सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र आले होते. तेव्हा, मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यातून आरोपींनी रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी आणि रिक्षाची कोयत्याने तोडफोड केली आहे.
नूतन वर्षाच स्वागत वाहन तोडफोडीने
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात नूतन वर्षाचे स्वागत वाहन तोडफोडीच्या सत्राने झाले आहे. शहरातील मोहन नगर येथे दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून कोयत्याने सहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, नूतन वर्षाची सुरुवातच वाहनांच्या तोडफोडीच्या सत्राने झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.