महाराष्ट्र

maharashtra

Pune Mumbai Expressway पुणे मुंबई एक्स्प्रेसवेवर दीड वर्षांत 300 अपघातांमध्ये १२५ प्रवाशांचा मृत्यू

By

Published : Aug 15, 2022, 8:09 PM IST

पुणे मुंबई एक्स्प्रेसवेवर Pune Mumbai Expressway accident ratio गेल्या दीड वर्षांत तीनशे अपघातांमध्ये १२५ प्रवाशांचा मृत्यू झाला Statistics of accidents on Pune Mumbai Expressway आहे तर २११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या वर्षी गेल्या सहा महिन्यांत जीवघेणे अपघातांचे प्रमाण घटले असले तरी गंभीर जखमी होणाऱ्या अपघातांमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई-पुणे प्रवास हा जलद आणि सुरक्षित व्हावा या उद्देशाने एक्स्प्रेसवे बांधण्यात आला. पण गेल्या काही वर्षांत एक्स्प्रेसवेवर भरधाव वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

Pune Mumbai Expressway
पुणे मुंबई एक्स्प्रेसवे

पुणे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा पुणे मुंबई हायवेवर अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर पुणे मुंबई हायवेवरील सुविधा त्याचबरोबर पुणे मुंबई हायवेवरील अपघातच प्रमाण काय आहे हे जाणून घेऊया.


हा महामार्ग की मृत्यूचा सापळापुणे मुंबई एक्स्प्रेसवेवर Pune Mumbai Expressway accident ratio गेल्या दीड वर्षांत तीनशे अपघातांमध्ये १२५ प्रवाशांचा मृत्यू झाला Statistics of accidents on Pune Mumbai Expressway आहे तर २११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या वर्षी गेल्या सहा महिन्यांत जीवघेणे अपघातांचे प्रमाण घटले असले तरी गंभीर जखमी होणाऱ्या अपघातांमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई-पुणे प्रवास हा जलद आणि सुरक्षित व्हावा या उद्देशाने एक्स्प्रेसवे बांधण्यात आला. पण गेल्या काही वर्षांत एक्स्प्रेसवेवर भरधाव वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.


गंभीर जखमी होणाऱ्यांचे अपघात ३६ टक्क्यांनी वाढलेगेल्या वर्षी २०० अपघात पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर २०२१ मध्ये एकूण २०० अपघात झाले होते. त्यामध्ये ७१ जीवघेणे अपघात असून त्यात ८८ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी ५४ अपघातांत १४६ जण गंभीर जखमी झाले होते. या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत १०३ अपघात झाले आहेत. त्यापैकी ३० प्राणांतिक अपघात झाले असून त्यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला. तर ६५ जण गंभीर जखमी झाले. याशिवाय १४ जण किरकोळ जखमी झाले. गेल्या सहा महिन्यांत २०२१च्या तुलनेत जीवघेणे अपघात २७ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मात्र गंभीर जखमी होणाऱ्यांचे अपघात ३६ टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ अपघात ५० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.


बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातएक्स्प्रेस-वेवर ८० किलोमीटर वेगाची मर्यादा आहे. वाहन चालकांकडून वेग मर्यादा पाळण्यात येत नाही. बहुतेक प्रवासी वाहने हे १०० किमीपेक्षा अधिक गतीने धावत असतात. त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण ती परिणामकारक नसल्याचे दिसून येत आहे. ट्रक व इतर मोठ्या वाहनांकडून लेनची शिस्त पाळली जात नसल्यामुळे अपघात होत असल्याचे आढळले आहे. त्याबरोबरच बंद पडलेले ट्रकच्या बॅकलाइट चालकांकडून लावल्या जात नाहीत. त्यामुळे अंधारातील वाहने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वेळीच दिसत नाहीत आणि अपघात होतात.

हेही वाचाMinor Girl Gang Rape स्वातंत्र्य दिनीच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details