गोवा - शहरातील एका हॉटेलमध्ये हिमाचल प्रदेशची तरुणी मृतअवस्थेत आढळली आहे. अल्का सैनी असे तरुणीचे नाव आहे. अल्का ही तिचा प्रियकर सुखविंदर सिंगसोबत गोवा फिरायला आली होती. दोघेजण २० एप्रिलपासून हॉटेलमध्ये राहत होते. पंरतु, घटनेनंतर प्रियकर सुखविंदर हा फरार झाला आहे.
गोव्यात हॉटेलमध्ये आढळला महिला पर्यटकाचा मृतदेह - मृतदेह
अल्का सैनी प्रियकर सुखविंदर सिंगसोबत गोवा फिरायला आली होती. घटनेनंतर प्रियकर सुखविंदर हा फरार झाला आहे.
संग्रहीत छायाचित्र १
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ५ वाजताच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेवून तो बॅमोबिल्म मेडिकल कॉलेज येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी अंजुना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अल्काचा प्रियकर सुखविंदर लापता आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती पोलीस निरिक्षक नवलेश देसाई यांनी दिली.