महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पर्यटक नसल्याने गोव्यात शुकशुकाट... भुकेल्या भटक्या कुत्र्यांना लाईफगार्डची मदत

गोव्यात आलेले पर्यटक समुद्र किनारी बसून जेवणाचाही आनंद घेतात. यावेळी उरलेले जेवण, हाडांचे तुकडे येथील कुत्रे खातात. मात्र, आता पर्यटकच नसल्याने कुत्र्यांना खाण्यासाठी काहीच मिळेनासे झाले आहे. त्यामुळे येथील स्थानिक नाईटक्लब आणि लाइफगार्ड्सच्या टिमने कुत्र्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आहे. जवळजवळ २०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना ते खायला देत आहेत.

with-tourists-missing-goa-lifeguards-feed-hungry-stray-dogs
with-tourists-missing-goa-lifeguards-feed-hungry-stray-dogs

By

Published : Apr 9, 2020, 11:45 AM IST

पणजी- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचे लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. गोव्यातील पर्यटन स्थळ असलेले गोव्याचे बीच देखील बंद आहेत. ऐरवी याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, लाॅकडाऊनमुळे याठिकाणी भुकेलेले भटके कुत्र्ये फिरत आहेत.

हेही वाचा-बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर

गोव्यात आलेले पर्यटक समुद्र किनारी बसून जेवणाचाही आनंद घेतात. यावेळी उरलेले जेवण, हाडांचे तुकडे येथील कुत्रे खातात. मात्र, आता पर्यटकच नसल्याने कुत्र्यांना खाण्यासाठी काहीच मिळेनासे झाले आहे. त्यामुळे येथील स्थानिक नाईटक्लब आणि लाइफगार्ड्सच्या टिमने कुत्र्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आहे. जवळजवळ २०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना ते खायला देत आहेत.

दरम्यान, दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 15 वा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details