पणजी- गोव्यात सुरू होणारी आयआयटी शैक्षणिक संस्था उभारणी करण्यासाठी सत्तरी तालुक्यातील गुळेली गावची निवड करून मंजुरी दिल्याबद्दल आरोग्य मंत्री आमदार विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत.
आयआयटीसारख्या या प्रतिष्ठित ज्ञान संस्थेमुळे गोव्याच्या नावलौकिकात भर पडणार आहेच, परंतु गोवाही देशाच्या शैक्षणिक नकाशात एक उत्तम संस्था म्हणून स्थान मिळवेल. असे मत विश्वजीत राणेंनी व्यक्त केले. शिक्षणाचा दर्जा वाढण्या बरोबरच संशोधन आणि उद्योजकता यांनाही संधी मिळणार आहे. आयआयटी गोव्यात आल्यामुळे संबंधित विविध संस्थामध्ये समन्वय सुरू होईल. तसेच सत्तरी आणि उसगाव परिसराच्या आर्थिक विकासाला मदत होईल, असेही राणे म्हणाले.