पणजी- माजी आमदार तथा विद्यमान आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या विरोधात अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी सभापतीसमोर दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा यापूर्वी यासंदर्भात दिलेल्या अंतिम निर्णयाचा अभ्यास करुन २२ मे रोजी निर्णय दिला जाणार आहे.
विश्वजीत राणेंवरील अपात्रता याचिकेवर 22 मे ला अंतिम निर्णय - पणजी
अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी विश्वजीत राणे यांच्या विरोधात २० जुलै २०१७ मध्ये जेव्हा अपात्रता याचिका दाखल केली होती. तेव्हा ते सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यानंतर ६ महिन्यात ते सदस्य म्हणून निवडून आले.
हंगामी सभापती मायकल लोबो यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंकडील वकील उपस्थित होते. त्यांनी आपापली बाजू पटवून दिली आहे. यानंतर हंगामी सभापती मायकल लोबो म्हणाले, अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी विश्वजीत राणे यांच्या विरोधात २० जुलै २०१७ मध्ये जेव्हा अपात्रता याचिका दाखल केली होती. तेव्हा ते सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यानंतर ६ महिन्यात ते सदस्य म्हणून निवडून आले. सदर याचिकेवर ४ ऑगस्ट २०१७ आणि ४ सप्टेंबर २०१७ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर दीड वर्ष सुनावणी झाली नाही.
याचिकाकर्ते आणि समोरील पक्ष यापैकी कोणीही जोड याचिका सादर केलेली नाही. दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू मांडली. सुमारे अर्धा तास सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात यापूर्वी दिलेला निर्णय अभ्यास करून २२ मे रोजी अंतिम निर्णय देण्यात येईल. यासाठी दोघांनाही बोलावण्यात येणार आहे, असेही लोबो यांनी सांगितले.