पणजी- गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीआहे. दोन दिवस चालणारे हे सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फार महत्वाचे मानले जात आहे. आगामी चार महिन्यात करावयाच्या महत्वाचा कामांना या अधिवेशनात मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप सरकारचा असणार आहे.
अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे -
मागच्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच भूमिपुत्र बिल, बेरोजगारी, महादेई नदीचा प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, दहा हजार नोकऱ्या या मुद्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत.