पणजी- गोव्यात आज (बुधवार) 8 जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या 46 झाली आहे. आज 324 अहवाल प्राप्त झाले. तर गोव्यातून आतापर्यंत 7 रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.
गोव्यात कोरोना रुग्णांची वाटचाल अर्धशतकाकडे...
इतर राज्यातून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये दिल्लीहून आलेल्या चार, महाराष्ट्रातून आलेल्या तीन तर पश्चिम बंगाल येथून आलेल्या एका प्रवाशाचा यामध्ये समावेश आहे. सर्व रुग्णांवर मडगाव येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर राज्यातून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये दिल्लीहून आलेल्या चार, महाराष्ट्रातून आलेल्या तीन तर पश्चिम बंगाल येथून आलेल्या एका प्रवाशाचा यामध्ये समावेश आहे. सर्व रुग्णांवर मडगाव येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची तब्येत स्थिर आहे. कोविड रुग्णालयात सध्या 39 तर विलगीकरण कक्षात 9 रुग्ण आहेत. विविध ठिकाणी 581 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आज 332 नमुन्यातील 316 निगेटिव्ह तर 8 पॉझिटिव्ह आले. तर 8 अहवालांची प्रतीक्षा आहे. आंतरराज्य प्रवास केलेल्या 4440 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज 109 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. गोव्यात 29 जानेवारीपासून आतापर्यंत 9549 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ज्यामधील 9541 अहवाल प्राप्त झाले आहेत. सुरूवातीला पुणे येथे तपासणीसाठी नमुने पाठवले जात असत. तर आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयात व्हायरलॉजी प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर गोव्यातच नमुने तपासणी केली जाते. याची क्षमता 500 हून अधिक आहे.