महाराष्ट्र

maharashtra

गोव्यातील दहावीची परीक्षा रद्द, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

By

Published : May 23, 2021, 9:24 PM IST

Updated : May 23, 2021, 10:05 PM IST

कोरोनाच्या आजारामुळे गोवा सरकारने दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा रविवारी (दि. 23 मे) केली. येत्या दोन दिवसांत बारावीच्या निर्णयाची घोषणा केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी (दि. 23 मे) केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी (गोवा)- कोरोनाच्या आजारामुळे गोवा सरकारने दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा रविवारी (दि. 23 मे) केली. येत्या दोन दिवसांत बारावीच्या निर्णयाची घोषणा केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी (दि. 23 मे) केली आहे.

बोलताना मुख्यमंत्री सावंत

कोरोनामुळे घेतला निर्णय

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी (माध्यमिक शाळा प्रमाणपत्र) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळ, राज्य शिक्षण विभाग, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व इतर यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 2020-21 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार दहावीचे गुण दिले जातील, असे सावंत म्हणाले.

विज्ञान आणि डिप्लोमा साईटसाठी एक दिवसीय 'ऑब्जेक्टिव्ह' परीक्षा

सावंत म्हणाले, जे एक किंवा दोन विषयांत नापास झाले आहेत ते एटीकेटी परीक्षेस येऊ शकतात. ज्यांना विज्ञान आणि डिप्लोमा साईट निवडण्याची इच्छा आहे त्यांना एकदिवसीय ऑब्जेक्टिव्ह परीक्षा द्यावी लागेल, ही गोवा बोर्डाकडून घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्याच परीक्षेबद्दल एक दिवस अगोदर माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, खासगी विद्यार्थी जे नाईट स्कूलमध्ये किंवा ड्रॉप आउटसाठी शाळेत शिकतात. त्यांना एक किंवा तीन दिवसांची परीक्षा घ्यावी लागेल, ज्याच्या तारखांची घोषणानंतर केली जाईल.

सर्वांच्या हिताचाच हा निर्णय

बारावीच्या परीक्षांविषयी बोलताना सावंत म्हणाले की, सर्व बाबींचा विचार करून त्या संदर्भातील निर्णय मंगळवार किंवा बुधवारी जाहीर केला जाईल. परीक्षेबाबत आपल्याला वेळोवेळी पालकांचे फोन आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात शाळकरी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी आपण तद्न्य समितीच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आला आहे. सर्वांच्या हिताचाच हा निर्णय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यापूर्वी गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा 24 एप्रिलपासून घेण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला होता. दरम्यान, गोव्यातील विरोधी पक्षांनी शनिवार 24 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या दहावी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत किंवा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री सावंत यांनी परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा- गोव्यात चक्रीवादळामुळे १४६ कोटींचे नुकसान, लॉकडाऊनमध्ये ३१ मेपर्यंत वाढ

Last Updated : May 23, 2021, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details