महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राफेलमुळे शत्रुपक्षाला आता विचार करावा लागेल - संरक्षण राज्यमंत्री नाईक - rafale

राजनाथ सिंह यांनी विजयादशमीनिमित्त फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाचे पूजन केले होते. मंगळवारी फ्रान्सने औपचारिकरीत्या राफेल भारताला सुपूर्त केले. तेव्हा संरक्षण मंत्र्यांनी राफेलचे शस्त्रपूजन केले.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक

By

Published : Oct 10, 2019, 10:11 AM IST

Updated : Oct 10, 2019, 10:20 AM IST

पणजी - बहुचर्चीत राफेल लढाऊ विमान मंगळवारी भारतीय वायुदलाला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी फ्रांसमध्ये जाऊन भारताच्या पहिल्या राफेल विमानाचे पूजन केले होते. त्यामुळे वायूदलाची ताकद वाढली असून यापुढे शत्रुला विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली.

राज्यमंत्री श्रीपाद नाईक

हेही वाचा - देशांतर्गत विमान प्रवासावर 'विस्तारा'कडून ऑफर; ४८ तासात करावी लागणार बुकिंग

पणजीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाईक आले होते. यावेळी त्यांनी राफेलवर आपले मत व्यक्त केले. नाईक म्हणाले, वायू सेना दिनादिवशीच भारताला पहिले राफेल मिळाले हा चांगला योगायोग जुळून आला. एकूण ३६ एअरक्राफ्ट खरेदी केली जाणार आहेत. त्याच्या निर्मितीसाठी वेळ लागतो तो नेमका सांगता येत नाही. जर वेगाने निर्मिती झाली तर वर्षात एक किंवा दोन राफेल भारताला मिळणार आहेत.

हेही वाचा - देशमुख बंधू काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात ठरू शकतात प्रभावशाली?

Last Updated : Oct 10, 2019, 10:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details