पणजी- कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, मतदारांचा आशीर्वाद आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेला विकास यामुळे पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज व्यक्त केले. त्यांनी रायबंदर येथे मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी नाईक म्हणाले, मागील 25 वर्षे भाजप पणजीत जिंकत आला आहे. पर्रीकर यांनी पणजी शहराचा केलेला कायापालट यांची येथील लोकांना जाणीव आहे. त्यामुळे ही जागा आम्ही जिंकणार आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर तिसऱ्यांदा पणजी विधानसभेत प्रवेश करणार हे निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.