महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोकसभा निवडणूक : दिव्यांग मतदारांसाठी विशेष मतदान केंद्राची सुविधा

पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे उत्तर गोव्यासाठी विशेष मतदान केंद्र बनविले आहेत. या मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी हेही विशेष कर्मचारी आहेत. तसेच अंधूक नजर असलेले आहेत. मतदानासाठी या सर्वांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दिव्यांग मतदान केद्रासाठी नियुक्त कर्मचारी

By

Published : Apr 23, 2019, 4:21 PM IST

पणजी- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यावेळी दिव्यांगांना सहजरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा येथे स्वंतत्रपणे प्रत्येकी एक मतदान केंद्र तयार केले आहे. त्याला दिव्यांग मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून त्या मतदारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

नोडल ऑफिसर नारायण गाग
पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे उत्तर गोव्यासाठी विशेष मतदान केंद्र बनविले आहेत. याचे नोडल ऑफिसर नारायण गाग म्हणाले, या मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी हेही विशेष कर्मचारी आहेत. तसेच अंधूक नजर असलेले आहेत. मतदानासाठी या सर्वांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच मतदारांशाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. येथे ब्रेल लिपीतील यंत्रणा आहे. तसेच ट्रान्सजेंडर यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे यासाठी त्यांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.


मतदान केंद्रावरील सुविधांविषयी बोलताना डिझाबिलिटी राईटस असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष आवेलीन डिसा म्हणाले, गोवा निवडणूक आयोगाने यावेळी दिव्यांगांना मतदान करता यावे यासाठी दिलेली ही चांगली सुविधा आहे. येथे ब्लेल सुविधाही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच मतदार केंद्रापर्यंत यावेत यासाठी वाहतूक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात रँम्प बनविले नसल्याचे चित्र दिसून आले असल्याचेही ते म्हणाले.

११ वाजेपर्यंत मतदान


सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर गोवा मतदारसंघात २६.५२ तर दक्षिण गोवा मतदारसंघात २६.५८ टक्के मतदान झाले आहे. दोन्ही मतादारसंघात ११ वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघात २६.५५ टक्के मतदान झाले आहे. गोवा विधानसभा पोटनिवडणूक होत असलेल्या शिरोडा, म्हापसा आणि मांद्रे मतदारसंघात अनुक्रमे २९.१६, २६.८१ आणि २६.६० टक्के इतके मतदान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details