महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Satej Patil in Goa : महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा गोव्यात घरोघरी जाऊन प्रचार - सतेज पाटील गोवा दौऱ्यावर

राज्य व देशातील अनेक नेते गोव्यात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil in Goa )यांनी देखील काँग्रेस उमेदवार विकास प्रभुदेसाई यांच्या प्रचारात सहभागी होऊन त्यांनी पर्वरी मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार केला.

Satej Patil in Goa
सतेज पाटील

By

Published : Feb 5, 2022, 2:13 PM IST

पणजी - गोव्यात विधानसभा निवडणूक प्रचार ( Goa Assembly Election 2022 ) आत्ता रंगात आला आहे. राज्य व देशातील अनेक नेते गोव्यात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil in Goa )यांनी देखील काँग्रेस उमेदवार विकास प्रभुदेसाई यांच्या प्रचारात सहभागी होऊन त्यांनी पर्वरी मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार केला.

अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड परमबीर सिंहच होता. महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. ज्या वेळी सत्य बाहेर येईल त्यावेळेला कळेल हे सर्व आरोप खोटे आहेत, असे सतेज पाटील म्हणाले.

महाराष्ट्राला अस्थिर करणे हा एकच अजेंडा सध्या भाजपाचा आहे. भाजपाने पाच वर्षे विरोधी पक्षात रहावे आणि काम करू द्यावे, असे सतेज पाटील म्हणाले.

गोव्याचे राजकारण....

गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी बिगुल वाजले आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनेकवेळा गोव्यात त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) झाली होती. मात्र, यावेळी त्रिशंकू होणार की भाजपला पूर्ण बहुमत मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे.

हेही वाचा -Goa Assembly Election: गोव्याच्या राजकारणात महिलांना नगण्य स्थान

ABOUT THE AUTHOR

...view details