पणजी -गोव्यात मार्च 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2017) काँग्रेसने 40 पैकी सर्वाधिक 17 जागा जिंकल्या. भाजपने या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. पण 2 अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या दोन पक्षांच्या प्रत्येकी 3 आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या अटीनुसार मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात येत मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यानुसार मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा 14 मार्च 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली.
हेही वाचा -Goa Assembly Election : गोव्यात किती महिला विधानसभेच्या रिंगणात, याबद्दलचा विशेष रिपोतार्ज...
गोवा विधानसभा निवडणूक तारीख : १४ फेब्रुवारी २०२२
गोवा विधानसभा निवडणूक निकाल तारीख : १० मार्च २०२२
- गोवा विधानसभा २०१७ पक्षीय बलाबल -
एकूण आमदार संख्या : ४० आमदार
भाजप - 13 आमदार
काँग्रेस - 17 आमदार
गोवा फॉरवर्ड - 3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी - 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस - 1 आमदार
अपक्ष - 3 आमदार
2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 17 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, लुईझींनो फलेरो आणि दिगंबर कामत यांच्या मुख्यमंत्री पदावरून झालेल्या अंतर्गत वादात भाजपाने आपल्या 13 आमदारसह महाराष्ट्र गोमंतक पक्ष 3 आमदार, गोवा फॉरवर्ड 3 आमदार व 2 अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून विजयी झालेले विश्वजित राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. आणि यामुळे भाजपची एक जागा वाढली परिणामी काँग्रेसची एक जागा कमी झाली.
- विश्वजित राणे यांच्या पक्षबदलानंतर बलाबल -
भाजपा - 14 आमदार
काँग्रेस - 16 आमदार
गोवा फॉरवर्ड - 3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी - 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस - 1 आमदार
अपक्ष - 3 आमदार
- 2019 ला राजकीय परिस्थिती बदलली -
2019 ला भाजपचे तत्कालीन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा व त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचे निधन झाले. त्यातच मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर या दोन काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला होता, म्हणून विधानसभेतील पक्षिय बलाबल होते.
भाजपा - 12 आमदार
काँग्रेस - 14 आमदार
गोवा फॉरवर्ड - 3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी - 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस - 1 आमदार