महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात मुसळधार : पुढील 5 दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी

हवामान खात्याने सोमवारी दुपारी मच्छीमारांना विशेष सूचना जारी केली आहे. तसेच पुढील 5 दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी करत येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

गोव्यात मुसळधार

By

Published : Aug 5, 2019, 4:27 PM IST

पणजी- सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासात जुने गोवे, साखळी, दाबोळी, मुरगांव, केपे, सांगे आदी भागांत 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचल्याने चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर 24 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोव्यात पुढील 5 दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी

हवामान खात्याने सोमवारी दुपारी मच्छीमारांना विशेष सूचना जारी केली आहे. तसेच पुढील 5 दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी करत येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या काळात 115 ते 200 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.

या काळात समुद्र खवळलेला असणार आहे. तसेच राज्यात पावसाचा वेगही वाढत आहे. सध्या समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे 60 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. तर जमिनीवरील वाऱ्याचा वेग हा ताशी 20 ते 25 किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने सुचना जारी केली आहे.

दरम्यान, राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतीतर्फे नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details