पणजी- मुंबई कस्टम यॉट क्लबचे आज डोनापावल जेटी येथे आगमन झाले. गोव्याचे मुख्य जीएसटी आयुक्त अनबालगन यांनी त्याचे स्वागत केले. मुंबईहून २३ एप्रिलला हे यॉट निघाले होते.
मुंबई कस्टम यॉट गोव्यात दाखल, मुख्य जीएसटी कस्टम आयुक्तांनी केले स्वागत
मुंबई कस्टम यॉट क्लब हा नौकानयनाची आवड असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या क्लबने आतापर्यंत मस्कत, सेशल्स, सिंगापूर आदी ठिकाणचा जलप्रवास केला आहे.
मुंबई कस्टम यॉट क्लब हा नौकानयनाची आवड असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या क्लबने आतापर्यंत मस्कत, सेशल्स, सिंगापूर आदी ठिकाणचा जलप्रवास केला आहे. महसूल मुंबई कस्टम विभागाचे मुख्य आयुक्त बनी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईहून निघालेल्या या नौकेचे सारथ्य जीएसटीचे सहायक आयुक्त केनेथ डिसोझा यांनी केले.
गोव्यात दाखल झालेल्या या चमूमध्ये भारतीय महसूल सेवेच्या ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते व्यापार सुलभता, हरित कस्टम, स्वच्छता मोहीम यावरही दौऱ्यात भर देणार आहेत.