पणजी - 'वायू' चक्रीवादळ गोव्याची सागरी सीमा ओलांडून गुजरातमार्गे उत्तरेच्या दिशेने वेगाने सरकत आहे. तरी मान्सून लांबणीवर पडूनही गोव्यात चांगल्याप्रकारे पाऊस पडत आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या गोवा केंद्राकडून देण्यात आली.
आल्तीनो-पणजी येथील भारतीय हवामान खाते केंद्र प्रभारी डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी याविषयी माहिती दिली. 'चक्रीवादळ 'वायू' गोव्याच्या सागरी सीमेला समांतर वाहात होते. आज सकाळी पाचच्या सुमारास गोव्याची सागरी सीमा ओलांडून ते वेगाने उतरेकडे सरकले. दरम्यान, 'वायू'च्या प्रभावामुळे मान्सूनचे गोव्यातील आगमन दोन दिवस लांबणीवर पडले आहे. मान्सून सध्या उत्तरकेरळ पर्यंत पोहचला आहे. तो गोव्यात एकदोन दिवसांत दाखल होईल,' असे ते म्हणाले.
मान्सून लांबला तरी 'वायू' चक्रीवादळामुळे गोव्यात चांगला पाऊस - rain
'मान्सून लांबला तरीही चक्रीवादळामुळे गोव्यात चांगला पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस फोंडामध्ये तर सर्वात कमी पावसाची नोंद पेडणे झाली आहे,' असे डॉ. पडगलवार यांनी म्हटले आहे.
गोव्यात चांगला पाऊस
'मान्सून लांबला तरीही चक्रीवादळामुळे गोव्यात चांगला पाऊस झाला आहे. आज सकाळी साडेआठपर्यंत नोंदणी झाल्याल्या प्रमाणानुसार मागील चोवीस तासांत गोव्याच्या सर्वच ठिकाणी कमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस फोंडामध्ये तर सर्वात कमी पावसाची नोंद पेडणे झाली आहे,' असे डॉ. पडगलवार यांनी म्हटले आहे.