पणजी -मागच्या काही वर्षापासून बंद असलेले मायनिंग पुढील पाच महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांनी विधानसभेत दिली. मायनिंग बंद झाल्यामुळे अनेक लोकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली होती. हाच महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीत हाताशी धरून विरोधकांनी सरकार विरोधात आवाज उठला होता.
2012 पासून मायनींग बंद - तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात मायनिंगमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार ( Corruption during Congress government ) झाल्याचे कारण देऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ( Manohar Parrikar ) यांनी खाणबंदी करण्याविषयी कोर्टात धाव घेतली होती. तेव्हापासून सदर विषय हा न्यायालयात प्रलंबित होता. दरम्यान मधल्या काळात विरोधकांनीही वेळोवेळी सरकारला धारेवर धरत मायनिंग सुरू करण्याविषयी विनंती केली होती.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत राजकारण -मायनिंग बंद झाल्यामुळे अनेक लोकांना आपले रोजगार गमवावे लागले ( People Lost Their Jobs ) होते. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली ( Unemployment increased ) होती. हाच महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीत हाताशी धरून विरोधकांनी सरकार विरोधात आवाज उठला होता. आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसच्या ( AAP and Trinamool Congress ) अजंड्यावर हे महत्त्वाचे विषय होते. त्यांनी याविषयी प्रचंड जनजागृती करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. 2022 या विधानसभा निवडणुकीत मायनिंग क्षेत्रात राज्याच्या बड्या नेत्यांनी भेटी देऊन तेथील जनतेकडून सहानुभूती मिळवण्याचा ही प्रयत्न केला होता.