पणजी -गोव्यातील बंदरामध्ये जर ज्वालाग्रही पदार्थ असलेले जहाज येत असेल तर यापुढे बंदर कप्तान विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या संबधीचे पत्र मुख्यमंत्री आणि मुरगाव पत्तन न्यासला देणार आहे, अशी माहिती बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
..तरचं ज्वालाग्रही पदार्थ वाहतूक करणाऱ्या जहाजांना परवानगी द्या - मायकल लोबो - Goa Ship Transport News
राज्यातील बंदरामध्ये ज्वालाग्रही पदार्थ वाहतूक करणार जहाज येत असेल तर त्यांना बंदर कप्तान विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असेल, असे बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो म्हणाले. या संबधीत पत्र मुख्यमंत्री आणि मुरगाव पत्तन न्यासला देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
उत्तर गोव्यातील एका कार्यक्रमात आले असता मंत्री लोबो बोलत होते. ते म्हणाले, नाफ्ता सारखे ज्वालाग्रही पदार्थ वाहू जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले. यासाठी राज्य प्रशासशाचे नियंत्रण असले पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मुरगाव पत्तन न्यासला पत्र देणार असून अशा जहाजांना बंदरात दाखल होण्यापूर्वी बंदर कप्तान विभागाची पूर्व परवानगी घ्यावी अशी विनंती करणार आहोत. अशा प्रकारची जहाज आणि विशेषतः इंजिन विरहीत जहाजांना मुरगावात येऊ दिले जाणार नाही. दोनापावल येथील समुद्रात खडकावर अडकलेल्या जहाजाची पाहणी करणार असल्याचेही लोबो म्हणाले.