महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोमंतकीय टॅक्सीधारकांचे हित विचारात घेत सरकारने यंत्रणा उभारावी - मायकल लोबो - टँक्सीधारक

गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सीचालक यांच्यात सूरू असलेल्या वादाचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. पर्यटक नाराज होऊन परतत आहेत. हे परवडणारे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.

मायकल लोबो

By

Published : Jun 29, 2019, 7:35 AM IST

पणजी- गोमंतकीय टॅक्सीचालकांना परराज्यातील यंत्रणेखाली काम करायचे नाही. त्यामुळे स्थानिक युवकांना न्याय देण्यासाठी सरकारने यंत्रणा उभारणे आवश्यक आहे, असे मत गोवा विधानसभेचे उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

गोमंतकीय टॅक्सीधारकांचे हित विचारात घेत सरकारने यंत्रणा उभारावी - मायकल लोबो

विधानसभेतील कामकाजानंतर पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले, गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सीचालक यांच्यामध्ये सूरू असलेल्या वादाचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. पर्यटक नाराज होऊन परतत आहेत. हे परवडणारे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा. यामुद्यावर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी बैठकिचे आयोजन केले आहे. या बैठकीला उत्तर गोव्यातील टॅक्सीचालकांचे दोन्ही गट आणि दक्षिण गोवा ट
टॅक्सीचालक यांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच गोमंतकीयांचे हित विचारात घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी किनारी भागातील सर्व आमदारांनी उपस्थित रहावे.

टॅक्सी हा गोव्यातील पारंपरिक व्यवसाय आहे. तो स्वयंरोजगाराचा प्रकार आहे. त्यामुळे परराज्यातील यंत्रणेखाली स्वतः चा व्यवसाय करण्यास त्यांचा नकार आहे. याचा विचार करून सरकारने गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून अँपबेस्ड सेवा देण्याचे ठरविल्यास त्यांची तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक आणि 20 हजार गोमंतकीय टॅक्सीचालकांच्या हिताचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन होऊन यामध्ये पारदर्शकता आणणे आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details