नितीश बेलूरकरने मिळवला अबुधाबी इंटरनॅशनल चेस टुर्नामेंटचा तिसरा नॉर्म - अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ
गोव्याचा फिडे मास्टर नितीश बेलूरकर याने अबूधाबी येथे नुकत्याच पार पडलेल्या 'अबूधाबी इंटरनॅशनल चेस टुर्नामेंट'मध्ये तिसरा नॉर्म प्राप्त केला. एकूण 9 फेऱ्यांमधून नितीशने 5 ग्रँडमास्टर आणि 3 इंटरनॅशनल मास्टर यांचा सामना करत साडेचार गुणांची कमाई केली. 2421 गुणांसह खेळणाऱ्या नितीशला या स्पर्धेत 40.4 यलो गुणांचा लाभ झाला.
नितीश बेलुरकरने मिळवला अबूधाबी मास्टर्स इंटरनॅशनल चेस टुर्नामेंटचा तिसरा नॉर्म
पणजी -गोव्याचा फिडे मास्टर नितीश बेलूरकर याने अबूधाबी येथे नुकत्याच पार पडलेल्या 'अबूधाबी इंटरनॅशनल चेस टुर्नामेंट'मध्ये तिसरा नॉर्म प्राप्त केला. या स्पर्धेत जॉर्जियाचा जॉबावा बाडूर (2584) विजेतेपदाचा मानकरी ठरला.
नितीशची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे सप्टेंबर महिन्यात दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. तो ऑक्टोबर महिन्यात दिल्लीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष व वीजमंत्री निलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर आणि तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना अध्यक्ष महेश कांदोळकर यांनी नितीशचे अभिनंदन केले आहे.