पणजी - गोव्यातील खाण उद्योग केव्हा सुरु होईल याबाबत ठोस आश्वासन देण्याचे केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी टाळले. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी नोव्हेंबरमध्ये खाण उद्योग सुरु होईल, अशी यापूर्वी केलेली घोषणा खाण आपदग्रस्तांची दिशाभूल करणारी ठरली आहे. अशी टीका गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.
हेही वाचा - गोव्याला लुटणाऱ्या 'या' खात्याचा ताबा मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घ्यावा, काँग्रेसची मागणी
केंद्रीय मंत्री जोशी सोमवारी गोव्यात आले असता त्यांनी केंद्र सरकारच्या १०० दिवसांतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तेव्हा गोव्यातील बंद खाण व्यवसाय कधी सुरू होईल, असा प्रश्न करण्यात आला असता. त्यांनी खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. याचा आधार घेत गोवा सुरक्षा मंच पक्षप्रमुख सुभाष वेलींगकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गोवा भाजपा नेतृत्वावर टीका केली आहे.