२०२५ पर्यंत गोवा आयटी आशियात नंबर एक होणार- मुख्यमंत्री - goa it hub
राज्य २०२५ पर्यंत गोवा आशिया खंडातील आयटी क्षेत्रातील अग्रगण्य राज्य करणार असून गावागावांत याच क्षेत्रात उद्योजक निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील नवोदित व्यावसायिकांना केले आहे. ते रविवारी पणजीतील अंत प्रेरणा या आयटी स्टार्टअप कार्यक्रमात बोलत होते.
पणजी - राज्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी सरकारने नवीन आयटी उद्योजकांना पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे. राज्याला स्वतंत्र होऊन नुकतीच 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सरकारने गोवा@६० ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्याला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प गोवा राज्याने केला आहे. यासाठी गोवा सरकारच्या वतीने नवीन राज्यात नवीन व्यावसायिक तयार व्हावेत व त्यांच्या मार्गदर्शनासाठी अंत प्रेरणा या आयटी परिषदेचे आयोजन रविवारी पणजीत करण्यात आले होते. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, गोवा माहिती व तंत्रज्ञान खाते व गोवा स्टार्टअप कॉर्पोरेशन च्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले होते.