महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Election 2022 : गोव्यात मतदान शांततेत; पोस्टल मतांसह एकूण 78.94 टक्के मतदान

79 टक्के मतदान
79 टक्के मतदान

By

Published : Feb 14, 2022, 6:45 AM IST

Updated : Feb 14, 2022, 10:47 PM IST

20:39 February 14

गोव्यात अंतिम मतदान 78.94 टक्के

गोवा विधानसभेसाठी 78.94 टक्के मतदान झाले आहे. मात्र, पोस्टल मते विचारात घेतली तर सर्वसाधारणपणे 80 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.

सर्वाधिक मतदान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात झाले तर सर्वात कमी मतदान बाणवली मतदारसंघात 70.02 टक्के झाले आहे.

17:24 February 14

पाच वाजतापर्यंत 75.29 टक्के मतदान

गोव्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 75.29 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान राहील.

15:59 February 14

3 वाजेपर्यंत 60.18 टक्के मतदान

3 वाजेपर्यंत 60.18 टक्के मतदान

दुपारी 3 वाजेपर्यंत 60.18 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान राहील.

13:48 February 14

1 वाजेपर्यंत 44.62 टक्के मतदान

दुपारी 1 वाजेपर्यंत 44.62 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान राहील.

11:39 February 14

साडे अकरा पर्यंत 27 टक्के मतदान

सकाळी सात वाजतापासून गोव्यात निवडणुकीला सुरूवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत 11.04 टक्के इतके मतदान झाले. तर सकाळी साडे अकरापर्यंत 27 टक्के मतदान झाले आहे.

11:34 February 14

अमित पालेकर यांनी मतदान केलं

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर यांनी त्यांच्या आईसह विधानसभा निवडणुकीत मतदान केले. "बदल घडवून आणण्याचा हा आमचा क्षण आहे" असे ते म्हणाले.

11:14 February 14

विक्रमी मतदानाची अपेक्षा

आतापर्यंत 11.04% मतदानासह मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी अधिकाधिक लोकांनी मतदान करावे अशी आमची इच्छा आहे, विक्रमी मतदानाची अपेक्षा आहे. मॉक पोल दरम्यान 5 कंट्रोल युनिट्स, 11 VVPAT बदलण्यात आले, ही एक सामान्य प्रक्रिया आहे, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.

10:32 February 14

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोथंबी येथे मतदान केले

मुख्यमंत्र्यांनी मतदानाचा हक्क बजावला

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोथंबी येथे मतदान केले.

10:08 February 14

मुख्यमंत्र्यांनी बजावला हक्क

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोथंबी येथे मतदान केले.

10:06 February 14

सकाळी 9 वाजताची टक्केवारी

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरूवात झाली आहे. सकाळी सात वाजतापासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी नऊ वाजतापर्यंत गोव्यात 11.04 टक्के इतके मतदान झाले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

09:17 February 14

मायकल लोबो यांची प्रतिक्रिया

लोक मतदारसंघासाठी नाही तर गोव्यासाठी मतदान करतात. जेव्हा आपण गोव्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण बेरोजगार असलेल्या मुला-मुलींबद्दल, गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेल्या खाणकामाबद्दल, पर्यटन उद्योगातील समस्यांबद्दल बोलतो. जनता भविष्यासाठी मतदान करणार अशी प्रतिक्रिया कळंगुट येथील काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो यांनी दिली. ते गोव्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहे.

08:53 February 14

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी प्रार्थना केली

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी श्री रुद्रेश्वर देवस्थान, हरवलेम येथे प्रार्थना केली. गोव्यात मतदान सुरु आहे.

08:37 February 14

उत्पल पर्रीकरांनी मतदान केंद्राला भेट दिली

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीतील मतदान केंद्रांना भेट दिली. ते मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

07:57 February 14

अमित शाह यांचे गोव्यातील मतदारांना मतदानाचे आवाहन

मी आमच्या गोव्यातील भगिनी आणि बांधवांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. स्थिर, निर्णायक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारच राज्याचा विकास करू शकते. तर बाहेर या आणि समृद्ध गोव्यासाठी मतदान करा. - अमित शाह, केंद्रिय गृहमंत्री

07:52 February 14

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आरळेकर यांनी वास्को दी गामा येथे बूथ क्रमांक सातवर मतदान केले. आरळेकर हे मूळचे गोव्याचे आहेत. त्यामुळे त्यांनी आज गोव्यात मतदानाचा हक्क बजावला.

07:09 February 14

मतदानास सुरूवात

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई आणि त्यांच्या पत्नी रीथा श्रीधरन यांनी तळेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १५ वर मतदान केले.

06:27 February 14

आज सर्वच 40 जागांसाठी मतदान

गोवा विधानसभा निवडणुकीत एकूण ११ लाख ५६ हजार ७६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ लाख ६२ हजार ७९० पुरुष तर ५ लाख ९३ हजार ९६८ महिला मतदार आहेत. तसेच ४ तृतीयपंथीय मतदारांचाही समावेश आहे. राज्यभरात १ हजार ७२२ मतदान केंद्र आहेत.

Last Updated : Feb 14, 2022, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details