महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात लॉकडाऊन वाढविण्याची केलीय शिफारस - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - goa lockdown

3 मे नंतरही लॉकडाऊन वाढविण्याची शिफारस केली आहे. तसेच गोव्याच्या सीमा या बंदच असतील. तर दुसरीकडे गोव्यात आर्थिक घडामोडी सुरू करताना उद्योगांना आवश्यक कच्चा माल आयात आणि तयार माल निर्यात करण्यास मुभा दिली आहे.

goa corona free
गोव्यात लॉकडाऊन वाढविण्याची केलीय शिफारस - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By

Published : Apr 28, 2020, 7:38 AM IST

पणजी- गोवा सरकारने 3 मे नंतरही राज्यात लॉकडाऊन सुरू राहावे, अशी केंद्राकडे लेखी शिफारस केली आहे. त्याबरोबरच विदेशात असलेले गोमंतकीय गोव्यात येण्यास इच्छुक असल्यास कसे परत आणता येईल याविषयी चर्चा केली आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज व्हिडीओ कॉन्स्फरन्सिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधताना दिली.

पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी व्हीडीओ कॉन्स्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. संवादाची संधी मिळाली नाही. परंतु, आमचे म्हणणे लेखी सादर करताना 3 मे नंतरही लॉकडाऊन वाढविण्याची शिफारस केली आहे. तसेच गोव्याच्या सीमा या बंदच असतील. तर दुसरीकडे गोव्यात आर्थिक घडामोडी सुरू करताना उद्योगांना आवश्यक कच्चा माल आयात आणि तयार माल निर्यात करण्यास मुभा दिली आहे. यासाठी तयार करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे ही गोवा पोलीस अथवा गोवा सरकारने नव्हे तर केंद्राने तयार केली आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यास अद्यापही परवानगी नाही.


मुंबईतून कर्निका आणि आंग्रीया जहाजावर जरी गोमंतकीय खलाशांना उरवून घेतले असले तरीही जहाज संचालनालयाकडून ई-पासपोर्ट मिळालेला नसल्याने गोव्यात आणता आलेले नाही. त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी गोवा सरकारने पूर्ण तयारी केलेली आहे. परंतु, ते ज्या कंपनीमध्ये काम करत होते. त्याचा मालक सहकार्य करत नाही. मात्र, या खलाशांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, गोव्यातून आजही दोन विशेष विमानानी विदेशी पर्यटकांना घेऊन उड्डाण कले आहे. आतापर्यंत 6313 विदेशी पर्यटकांना मायदेशी सोडण्यात आले आहे.


डॉ. सावंत म्हणाले, केंद्र सरकारकडे खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच तिसऱ्या लॉकडाऊनंतर गोव्यातील स्थिती कशी असेल हे 3 मे नंतर स्पष्ट होणार आहे. तसेच शैक्षणिक वर्षांसंबंधात सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
दरम्यान, गोव्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते. त्याबरोबर वाहनचालकाचे छायाचित्र घेण्यात येत आहे. ज्यामुळे जी व्यक्ती वाहन घेऊन आले तिच व्यक्ती माघारी जाते की नाही हे तपासले जाते. यासाठी पोलीस महानिरीक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सीमेवर तपासणीकरिता पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सनदी अधिकारी तैनात करण्यात आले आहे. ज्यांच्या जवळ आवश्यक परवाने आहेत, अशाच वाहनांना प्रवेश दिला जात आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details