महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सीएए'चा त्रास गोमंतकियांना नाही होणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - goa assembly news

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की केवळ संभ्रम निर्माण करण्याऐवजी विरोधकांनी सीएए वाचला नसेल तर वाचावा. आपल्या देशाची धर्मनिरपेक्षेता आहे, तशीच ठेवली जाईल. यापुढे नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणालाही रांगेत रहावे लागणार नाही. तसेच यामध्ये पोर्तुगाल संबंधित कोणताही विषय नाही. विरोधक केवळ संभ्रम निर्माण करून अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वायावरण तयार करत आहेत.

goa,cm,caa
सीएएचा त्रास गोमंतकीयांना नाही होणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By

Published : Feb 3, 2020, 11:18 PM IST

पणजी - केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणात्याही गोमंतकीयांना त्रास होणार नाही. त्यांचे नागरिककत्व कोणीच हिरावणारा नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली. सीएए कायदा लागू केल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांचे अभिनंदन करणाऱ्या ठरावावर ते बोलत होते.


शून्य प्रहरात सत्ताधारी पक्षाचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला होता. तेव्हा जेवणाची वेळ झाल्याने सभापती राजेश पाटणेकर यांनी कामकाज स्थगित केले. जेवणानंतर त्यावर चर्चा सुरू झाली असता विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहाचा त्याग करत बाहेर निघून गेले. तरीही सत्ताधारी आमदार अभिनंदन ठरावावर बोलत होते. यावेळी सर्वांनी धार्मिक अल्पसंख्याक आणि विशेषतः पाकिस्तानमध्ये असलेल्या मूळ गोमंतकियांना कसा लाभ होणार आहे, हेच स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.


त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की केवळ संभ्रम निर्माण करण्याऐवजी विरोधकांनी सीएए वाचला नसेल तर वाचावा. आपल्या देशाची धर्मनिरपेक्षेता आहे, तशीच ठेवली जाईल. यापुढे नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणालाही रांगेत रहावे लागणार नाही. तसेच यामध्ये पोर्तुगाल संबंधित कोणताही विषय नाही. विरोधक केवळ संभ्रम निर्माण करून अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वायावरण तयार करत आहेत. मागील 9 वर्षांत केंद्राने 2830 पाकिस्तानी, 912 अफगाणिस्तानच्या आणि 112 बांग्लादेशी नागरिकांना नागरिकत्व बहाल केले आहे. एकवेळ नागरिकत्व देण्याचे समर्थन करणारा काँग्रेस पक्ष आता विरोध करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करणाऱ्या ठरावार अडीच तास चर्चा करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details