महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत काही क्षण रमले पर्यटकांत

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पणजीतील मिरामार समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. बुधवारी याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी उद्घाटन केले, यावेळी त्यांनी गोव्यातील पारंपरिक गाण्यावर पर्यटकांसोबत संगीतावर ठेकाही धरला.

goa
गोवा

By

Published : Nov 18, 2021, 9:25 AM IST

पणजी - पणजी समुद्र किनाऱ्यावर सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा झाला. यावेळी पोलिसांच्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत असणारे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) आज काही क्षणांसाठी का होईना पर्यटकांत(Goa Tourism)रममाण होऊन त्यांच्यासोबत फोटोग्राफीचा आनंद लुटला.

पणजीतील मिरामार समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत 12 कोटी खर्च करून या समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पर्यटकांसाठीबैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी बगीचा, खेळण्याचे साहित्य, नागरिकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, व्यायामाची सोय तसेच अन्य सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली असून भविष्यात राज्यातील सर्वच समुद्रकिनारे याच पद्धतीने सुशोभित करण्यात येणार त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटकांनी गोवन बँड च्या तालावर धरला ठेका -

राज्यात कला आणि संस्कृतीला फार मोठी परंपरा आहे. येथील संस्कृतीचे जतन करण्यासाठी सरकारही विविध योजना राबविते. त्याचाच भाग म्हणून कार्यक्रमस्थळी असलेल्या गोवन बँडमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला होता. या बँडवर पर्यटकांनीही ठेका धरला होता. एकीकडे कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमात पर्यटकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे पर्यटकही यात सहभागी होत त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीचा आनंद लुटला.

ABOUT THE AUTHOR

...view details