पणजी - २०१७ साली ४० पैकी सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेस राज्यातील पहिला पक्ष ठरला होता. मात्र अंतर्गत वादामुळे बहुमताच्या आकड्यांचा खेळ न जुळवता आल्यामुळे काँग्रेस पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले. मात्र तेव्हापासून काँग्रेसची उतरती कळा लागली ती २०२२ ला काँग्रेसचे फक्त २ आमदार शिल्लक राहिले.
अशी झाली काँग्रेस क्या अधोगतीला सुरुवात
२०१७ ला सत्तास्थापनेपासून काँग्रेस दूर राहिली. त्याचवेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या विश्वजित राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. पुढे ते भाजपावासी होऊन मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले. एव्हाना काँग्रेसची सदस्यसंख्या १६ असताना २०१९ साली मांद्रे आणि शिरोडाचे आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि झालेल्या पोटनिवणुकीत ते भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले आणि काँग्रेसची सदस्यसंख्या १४ वर पोहोचली. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजीच्या जागेवर काँग्रेसच्या बाबुष मोंसरत यांचा विजय झाला व काँग्रेसची सदस्य संख्या १५ वर स्थिरावली. १० जुलै २०१९ काँग्रेसच्या इतिहासात काळी रात्र १५ सदस्य संख्या असणाऱ्या काँग्रेसच्या १० व म.गो. यांच्या २ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. 2022 ची निवडणूक त्या 12 आमदारांसाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे.
'त्या' 12 आमदारांची नावे -
- बाबुश मोंसरात (पणजी) - बाबुश मोंसरात यांनी आपल्या पत्नीसह भाजपात प्रवेश केला. 2022 ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकीटावर पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविली असून त्यांना आव्हान दिले आहे ते अपक्ष व भाजपचे बंडखोर उमेदवार उत्पल पर्रीकर व काँग्रेस चे एल्विस गोम्स यांचे.
- जेनिफर मोंसरात (तालीगव) - जेनिफर मोंसरात या बाबुश मोंसरात यांच्या पत्नी असून त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याविरोधात टोनी फर्नांडिज याना काँग्रेस ने तिकीट दिले असून सोबतच त्यांना आव्हान आहे. ते आम आदमी पक्षाच्या सेसिल रोद्रीग्स यांचं.
- अंतिनियो फर्नांडिज (सांताक्रूझ)- अंतिनोयो फर्नांडिज हे सांता क्रूझ मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने आव्हान आहे ते काँग्रेस च्या हृदलफ फर्नांडिज व आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर यांचे.
- फ्रान्सिस्को सिल्वेरा (सात आंद्रे)- सिल्वेरा सध्या भाजपच्या तिकिटावर सात आंद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांना आव्हान आहे ते काँग्रेस चे अँथनी फर्नांडिज, आम आदमी पक्षाचे रामराव वाघ, तृणमूल काँग्रेस पक्षाचे जगदीश भोबे यांचे.
- नीलकंठ हलरणकार (थिविम)- हलरणकार सध्या थिविम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत, त्यांना आव्हान आहे ते तृणमूल काँग्रेस च्या कविता कंडोळकर, काँग्रेस चे अमन लोटलीकर ,, आप चे उदय साळकर यांचे.
- फिलिप्स नेरी रोद्रीग्स (वेळीम)- वेळीम हा दक्षिण गोव्यातील ख्रिश्चन लोकवस्ती असलेला मतदारसंघ ,, त्यामुळे भाजपच्या तिकिटावर पुन्हा फिलिप्स रोद्रीग्स यांना निवडून येणे कठीण मानले जात होते म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविली आहे, यावेळी त्यांना खुद्द भाजपमधून आव्हान आहे ते सावियो रोद्रीग्स, काँग्रेस कडून सावियो डिसिल्वा आणि तृणमूल कडून बेंजामिन सिल्वा यांचे. 2019 भाजपात प्रवेश केल्यामुळे येथील मतदार रोद्रीग्स यांच्यावर नाराज आहेत.
- क्लफसीओ डायस (कुंकली) -डायस सध्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत, त्यांना आव्हान आहे ते काँग्रेस चे युरी आलेमाव, तृणमूल चे जोरसन फर्नांडिझ आणि आप चे प्रशांत नाईक यांचे.
- ईझींदोर फर्नांडिझ (कानकोन) - भाजपने तिकीट नाकारल्यामुळे फर्नांडिझ यांनी अपक्ष निवडणूक लढविली आहे,, त्यांना आव्हान आहे ते भाजपच्या रमेश तावडकर, काँग्रेस च्या जनार्दन भंडारी यांचे.
- बाबू कवलेकर (केपे) -बाबू कवलेकर हे भाजपच्या तिकिटावर सध्या निवडणूक लढवीत आहेत त्यांना आव्हान आहे ते काँग्रेस च्या अल्टोन डी कोस्टा, तृणमूल चे कांता गावडे आणि आप चे राहुल परेरा यांचे. कवलेकर यांच्या पत्नीही सांगे मतदारसंघात निवडणूक लढविली आहे, त्या अपक्ष उमेदवार असून त्यांच्याविरोधात भाजपकडून सुभाष फलदेसाई व काँग्रेस कडून प्रसाद गावकर यांनी निवडणूक लढविली आहे.
- विल्फ़्रेंड डीसा (नुवेम)- ते सध्या नुवेम मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवीत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आव्हान आहे ते भाजपच्या दत्ता बोरकर आणि काँग्रेस चया आलेक्स सिक्वेरा यांचे . सोबतच तृणमूल काँग्रेस पक्षाकडून जोस काब्राल यांचे त्यांना आव्हान आहे.