पणजी - गोव्यात गुरुवारी नव्याने चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या ५० झाली आहे. दिवसभरात ५९५ नमुन्यापैकी ५३९ निगेटिव्ह आले आहेत. तर ५२ अहवालांची प्रतीक्षा आहे. आता कोव्हिड रुग्णालयातील रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.
गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५० झाली असली तरीही अॅक्टीव रुग्ण ४३ आहेत. आतापर्यंत ७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. गुरुवारी दिवसभरात सापडलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातून रेल्वे, रस्ता आणि जल मार्गाने आलेल्या तिघांचा तर दिल्लीहून रेल्वेने आलेल्या एकाचा समावेश आहे. ८३७ जणांना विविध ठिकाणी क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे.
गोव्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, रुग्णसंख्या ५० वर - गोवा कोरोना अपडेट लाईव्ह
गोव्यात गुरुवारी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या नवीन रुग्णांसह गोव्यातील एकूण रुग्णांची संख्या ५० झाली आहे.
गोव्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, रुग्णसंख्या ५०वर
२९ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत १०,१३६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १०,०८४ अहवाल प्राप्त झालेले आहेत. आंतरराज्य प्रवास केलेल्या ४,५२६ जणांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, मडगाव येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची तब्येत स्थिर आहे.