पणजी - गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता (70) यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचे मुंबईत निधन - डॉ. विल्फ्रेड मिस्किता
गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता (70) यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. त्यांनी गोव्याचे महसूल, वीज, पर्यावरण, क्रीडा आणि कायदा खात्याचे मंत्री म्हणूनही कामगिरी पार पाडली. 2012 मध्ये त्यांची एनआरआय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
14 एप्रिल 1949 रोजी जन्मलेल्या डॉ. मिस्किता यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर ऑफ मेडिसीन म्हणून सेवा दिली. मागील काही वर्षे वाडिया रुग्णालय आणि केईएम मुंबईमध्ये न्युरोसर्जन म्हणून ते सेवा देत होते. 1974 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या युवा शाखेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी गोव्याचे महसूल, वीज, पर्यावरण, क्रीडा आणि कायदा खात्याचे मंत्री म्हणूनही कामगिरी पार पाडली. तसेच ते माजी एनआरआय आयुक्तही होते. 2007 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 2012 मध्ये त्यांची एनआरआय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
डॉ. मिस्किता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करून म्हटले आहे, डॉ. मिस्किता यांच्या निधनामुळे दु:ख होत आहे. त्यांनी गोवा आणि गोव्यातील जनतेसाठी भरीव योगदान दिले आहे.