पणजी - रविवारी मुंबईहून गोव्यात पोहोचलेल्या मुंबई-गोवा या रेल्वेतील ७ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २९ वर गेला आहे.
मुंबई-गोवा या रेल्वेने आलेल्या १०० प्रवाशांचे स्वॅब नमुने हे गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णलयात तपासणीकरता पाठवण्यात आले होते. यापैकी ७ जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून आरोग्य खाते अंतिम अहवालाच्या प्रतिक्षेत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. रविवारी आढळलेल्या ७ जणांसह अन्य कोरोनाबाधितांना पकडून ही संख्या १६ वर पोहोचली आहे. तर, राज्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा हा २९ वर आहे. या सर्व रुग्णांना मारगाव येथील कोव्हिड-१९ रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले, असल्याची माहिती राणे यांनी दिली.
१ मे ला गोव्यातील त्यावेळेस भरती असलेले सातही कोरोनाबाधित उपचारानंतर बरे झाल्यानंतर गोवा राज्य हे ग्रीन झोनमध्ये आले होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून समुद्र किनारपट्टीवरही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही राज्यात कोरोनाचा समुदायिक प्रसार झाले नसल्याचा असा दावा केला आहे. गेल्या २४ तासात शनिवारी राजधानी एक्सप्रेसने राज्यात दाखल झालेल्या ६ प्रवाशांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, गोव्याशेजारील राज्यातून औद्योगिक कामानिमित्ताने आणलेल्या ३ मजुरांचाही शनिवारी प्राप्त चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहे.
राज्यात रविवारी १ हजार ९७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील ६२३ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर, १३ जणांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे राज्यात दाखल झालेल्या प्रवाशांपैकी कोरोनाबाधितांबरोबर प्रवास करणाऱ्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक असलीकरण करण्यात येणार असल्याचे राज्य आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. तसेच, राज्यात असलेल्या मारगाव येथील जिल्हा रुग्णालयासह मापुसा आणि पोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अतिरिक्त जलद चाचणी यंत्रे बसवून कोरोनासंदर्भातील चाचणी आणि संबंधित यत्रणा, सुविधांना बळकट करण्यासाठी राज्य पुढे सरसावले असून कोरोना आटोक्यात आणण्याकरता तोडीस प्रयत्न करताहेत.