पणजी -स्वतःच स्वत:ची 'कोविड-19 ' ची तपासणी करण्यासाठी उपयोगी ठरणारे 'टेस्ट युवरसेल्फ गोवा' हे अॅप आज गोवा सरकारने उपलब्ध करून दिले आहे. सॅन फ्रॅन्सिस्को अमेरिका येथील इनोव्हेसर या कंपनीच्या सहकार्याने गोवा सरकारने गोमंतकीयांना मोफत हे तंत्र उपलब्ध करून दिले आहे. येथील एका हॉटेलमध्ये याचे अनावरण करण्यात आले. यावेळी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आणि गोवा आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. ज्यो डिसा उपस्थित होते.
यावेळी बोलताना राणे म्हणाले, या अॅपच्या माध्यमातून लोकांनी माहिती जाणून घेत स्वतःची आवश्यक काळजी घ्यावी. कोरोना विषाणू संसर्ग पसरू नये म्हणून गोवा सरकार आवश्यक पावले उचलत आहे. विषाणू तपासणीकरिता लवकरात लवकर व्हायरालॉजी प्रगोगशाळा सुरू करण्यासाठी गोवा सरकार 3 कोटींहून अधिक रक्कम खर्च करत आहे. त्याबरोबरच केंद्राने अजून एक प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यावी म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. ज्या गोव्याशेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या जिल्ह्यांना त्याचा लाभ होईल.
'त्या' रुग्णालयाचा परवाना रद्द करणार -
गोव्यातील एका रुग्णालयाने संशयित रुग्ण भरती करून घेण्यास नकार दिला. त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्याचा परवाना रद्द करावा, असे सूचित केले आहे, असे राणे म्हणाले. ते पुढे म्हणाले त्याबरोबरच ज्या महिलेने दूरध्वनीद्वारे अफवा पसरवली होती. तिच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाईचे आदेश दिले आहेत.
राज्यभरात संचारबंदी -